Thursday 17 July 2014

बाबांचं गाव


प्रजूची मुंज झाल्यावर आम्ही हुन्नरगी ला देवाच्या दर्शनाला गेलो . हुन्नरगी माझाच काय पण आम्हा सर्व भावंडांच आवडतं  गाव आहे . जगात त्याच्यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही यावर आम्हा सगळ्यांचा अगदी ठाम विश्वास आहे. गांधी हत्येनंतर जी दंगल उसळली त्यामध्ये  गावातलं घर जाळलं . आजी -आजोबा हाताला लागेल ते सामान घेवुन , शेतावरच्या आमच्या घरात येवून राहिले. मग, परत कधी आम्ही गावात गेलोच नाही . शेतामधलं आमचं घरंच आम्ही रहाण्याचं ठिकाण बनलं , आणि आम्हा सर्वांच्या आवडीच पण झालं. घराच्या दोन्ही बाजूला  चिंचेची झाडं , घरासमोरची विहीर , समोर पसरलेलं शेत , घरामागं असणारा पाणदीचा मातीचा रस्ता ,  तिथून घराकडं येणाऱ्या वाटेवर असणारा गुलमोहोर , विहिरीशेजारी असणारी जास्वंद, चिकू , बांबुच बन, पिंपळ  , शेतातलं देवुळ , त्याच्याभोवतीने असणारी शमीची झाडं , औदुंबर , चंदन , सगळ सगळ अतिशय सुंदर आहे. चंदनाच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची फळं खूप चविष्ट असतात . टणक कवचातली ती फळं सोलून खायला मजा येते , अगदी छोटीशी असतात . आता मात्र ती झाड नाहीत तिकडे . मला जे भावलं ते खूपच थोडं कॅमेर्या मध्ये पकडता आलं . 





















Friday 3 May 2013

आठवणी

लहानपणच्या कितीतरी आठवणी परवा कोल्हापूर ला गेल्यावर मनात उसळुन आल्या़.
सगळ्यात आधी आठवली ती पची, माझी सगळ्यात पहिली मैत्रीण, जीच्यामुळे माझ्या आयुष्यात मैत्रीचा प्रवेश झाला....
पुढ़ बरेच मित्र-मैत्रीणी मिळाल्या, प्रत्येकजण माणुस म्हणुन समृध्द करत गेला. पण लहानपणची मैत्री ही निर्व्याज्य असते आणि आयुष्याभर पुरते , एवढ़ मात्र खर...